उपक्रम छायाचित्र
प्रस्तावना

संस्काराच्या पायावरती जीवन मंदिरे उभे करिती । तेव्हा होई सुखप्राप्ती सहजपणे ॥
संस्कार हा संस्कृतीचाच एक भाग असुन संस्कृतीचेच एक प्रमुख अंग आहे. मानव हा जन्मतःच संस्कारी किंवा ज्ञानी नसतो. तो जेव्हा जन्म घेतो, तेव्हा मासाचा गोळा म्हणुन जन्म घेतो. त्या मासाच्या गोळ्यावर खूप संस्कार करावे लागतात. त्या संस्कारातूनच चांगली अथवा वाईट पिढी घडत असते. बालवय हे संस्कारक्षम असते, त्या वयात संस्कार त्वरित आत्मसात करता येतात.
आपल्या मातापित्यांच्या भावी आशाआकांक्षा आपल्या बालकांवर केंद्रीत असतात. मुले ही मातापित्यांचे सर्वस्व तर असतेच त्याचबरोबर ते राष्ट्राची संपत्ती आणि समाजाचा अमुल्य ठेवा असतो.

बोधकथा

स्वामी दयानंद सरस्वती लहान असतानाची गोष्ट आहे.ते एका गुरुजींकडे शिष्य म्हणून राहत होते,त्यांचे गुरूजी अत्यंत विद्वान होते परंतु दोन्ही डोळ्यांनी अंध होते. या गुरुजींची शिस्त अत्यंत कडक होती त्यांना आश्रमाच्या आवारात केरकचरा खपत नसे. हा केर काढण्याचे काम बाल द्यानंदाकडे होते. एक दिवस काही कारणास्तव दयानंद केर काढू शकले नाही.

डाउनलोड करा

दिंडोरी प्रणीत बालसंस्कार वर्ग फ्लेक्स. यांपैकी एक फ्लेक्स केंद्रात लावावा.

बालसंस्कार वर्ग प्रचार-प्रसार पत्रक

दिंडोरी प्रणीत बालसंस्कार विभाग फ्लेक्स

गुरुमाऊलींचा संदेश – पालकांसाठी

सुजाण पालकत्व : मानवास परमेश्वराने नवनिर्मितीची विलक्षण उन्मेषशालिनी प्रतिभा दिली आहे. माणूस शेकडो वर्षांच्या पलीकडचे खरे अंदाज सहजपणे सांगू शकतो. अप्रतिम चिरंतन कलांची निर्मिती तो सहजपणे लीलया करतो. जे-जे काही अदृश्य व अमूर्त आहे त्याला साकार रुप व सखोल अर्थ माणसाने दिला आहे.

गुरुमाऊलींचा संदेश –विद्यार्थ्यांसाठी

बालगोपालांनी रोज आई-वडिलांना नमस्कार करावा तसेच गणपती स्तोत्र, सरस्वती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, मारुती स्तोत्र, गायत्री मंत्र, सूर्य मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र, सरस्वती मंत्र रोज म्हणावे. आहार – विहारावर नियंत्रण ठेवावे. संस्कृत श्लोक, स्तोत्र व मंत्राच्या नित्य पाठांतराने स्मरणशक्ती वाढते, वाणीला धार येते, अंगी चातुर्य व धैर्य येते, शब्दोच्चार स्पष्ट करता येतात, निर्भयता निर्माण होते, ज्ञानवृध्दी होते, पापभीरु वृत्ती निर्माण होते, व्यक्तित वैचारिक बैठक व पातळी निर्माण होते, प्रतिभाशक्ती वाढते, सूक्ष्म अर्थांचे आकलन होऊन ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती तीव्र बनते, इ. अनेक फायदे याद्वारे मिळतात. मात्र हे सर्व एकाच दिवशी झटपट होणे शक्य नाही हे येथे लक्षात घेणे जरुरीचे आहे. यासाठी अपार मेहनत घ्यावी लागेल, अखंड सायास करावे लागतील. यशोशिखर गाठणे तितकेसे सोपे नाही; मात्र ध्रुव्राचे मनोबल अंगी असेल तर ते सहज शक्य आहे.