व्यक्तिमत्व विकास

दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या की विज्ञानं शाखेची मुले, मुली पुढच्या प्रवेशाच्या तयारीला लागतात. अन्य शाखेच्या विद्यार्थ्याना तशी मार्च ते जून पर्यंतची सुट्टी मिळते. या दीर्घ सुट्टीचा उपयोग व्यक्तिमत्व विकासासाठी करणे योग्य राहील. व्यक्तिमत्व विकास हा एका सुटीत होण्या -सारखी छोटी गोष्ट नाही; परन्तु आरम्भ तर करायला हवा. म्हणजे आपले ध्येय त्या दिशेनेही क्रियाशील होइल. शालेतील पाठ्यपुस्तके शिकताना आपण परिक्षेकड़े फार लक्ष देतो. म्हणुन सगळा अभ्यासक्रम प्रश्न - उत्तरांच्या चौकटित बसवने, हेच आपले उद्दिष्ट बनते.

त्यामुळे आपल्या मानवीय क्षमतांचा विकास अपूर्ण राहतो किंवा अवरुद्ध होतो. वयानुसार या क्षमता, गुण प्रगल्भ होणे, विकसित होणे म्हणजे व्यक्तिमत्व विकास होय. हा विकास ख-या अर्थाने झाला आहे असे तेव्हाच म्हणता येइल, जेव्हा या क्षमतांचा, गुणांचा उपयोग व्यक्ति रोजच्या जीवनात उत्तमपणे जगण्यासाठी, मनोबल वाढवन्यासाठी, दैनंदिन जीवनाचे प्रश्न सोडवण्यासाठी करीत असेल. शिक्षणाचे उपयोजन जगण्यासाठी करता येणे, त्यातून स्व-जीवन व समाज जीवन उत्कृष्ट बनवित राहणे हा शिक्षणाचा खरा हेतु आहे. भगवद्गीतेत १७ व्या अध्यायात शारीरिक, मानसिक, वाचिक अशा तीन तपांची आवश्यकता प्रतिपादान केली आहे. देवता, गुरु, विद्वान. ज्ञानी व्यक्तींचा आदर करणे, निष्कपटता, सरळपणा, संयम, अहिंसा, पावित्र्य 'शारीरिक तप' आहेत. मनाची प्रसन्नता, स्थिरता, शांती, मौन, भगवद्- चिंतन, निग्रह, भाव-पावित्र्य, 'मानसिक तप' आहेत. सत्य, शांती, स्नेह, कल्याण-कामना, स्वाध्याय, अध्ययनशीलता, प्रयत्नशीलता 'वाणीचे तप' आहे. व्यक्तिमत्वात हे तीन तप सामंजस्याने रुजले, रुळले पाहिजेत. या त्रितपांनी बनलेले व्यक्तिमत्व समाजाला उत्कर्षाकडे नेणारे, हितकारक दिशा देणारे असते.

या दृष्टीने शिक्षण व व्यक्तिमत्वाचा सर्वांगीन विकास या एका नाण्याच्या दोन बाजु आहेत.परीक्षानिष्ठ शिक्षण पद्धतीत दुर्लक्षित झालेला व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी सुट्ट्याचे व्यवस्थित नियोजन करता येइल. आपण आपल्या व्यक्तिमत्वातिल अपूर्णता ओळखुन त्या दृष्टीने ते ते गुण विकसित घडवता येत नाही. त्यासाठी आत्मपरीक्षण करून आपल्यातील त्रुटी शोधल्या पाहिजेत. करण्याचा प्रयत्न करावा.

एका सुटीत त्यातली एक किंवा दोन त्रुटी पूर्ण करून घ्याव्यात. त्यासाठी प्रशिक्षण घ्यावे किंवा स्वत: प्रयत्न करावेत. याकरिता पालकांचे सहकार्य फार महत्वाचे आहे. पालकांनी वस्तूनिष्ठपणे आपल्या मुला - मुलींच्या उणीवा जिव्हाळ्याने, सुसंवादाने प्रयत्न केले पाहिजेत. पाल्ल्याच्या विकासासाठी असा प्रयत्न होणे गरजेचे असून ती आज काळाची गरज आहे.

- गुरुमाऊली प. पुज्य श्री आण्णासाहेब मोरे
गुरुमाऊलींचा संदेश – पालकांसाठी

सुजाण पालकत्व : मानवास परमेश्वराने नवनिर्मितीची विलक्षण उन्मेषशालिनी प्रतिभा दिली आहे. माणूस शेकडो वर्षांच्या पलीकडचे खरे अंदाज सहजपणे सांगू शकतो. अप्रतिम चिरंतन कलांची निर्मिती तो सहजपणे लीलया करतो. जे-जे काही अदृश्य व अमूर्त आहे त्याला साकार रुप व सखोल अर्थ माणसाने दिला आहे.