दिनचर्या म्हणजे काय? त्याचे महत्व काय?

आपण रोज सकाळी उठल्यापासुन ते रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी नियमितपणे करतो त्यास आपली दिनचर्या म्हणतात. उत्तम दिनचर्या ठेवल्याचे अनेक फायदे आहेत. नियमित दिनचर्या असेल तर आपल्या जीवनात अनुशासन राहते, जीवन शिस्तबध्द राहते, शरीराला आणि मनाला चांगल्या सवयी कायमच्या जोडल्या जातात ज्या कठिण प्रसंगांमध्ये आपणास खुप सहाय्यभूत राहतात. सेवा मार्गाच्या अतिशय महत्वाच्या अशा तेजोनिधी ग्रंथात सद्गुरु मोरेदादांचे जीवन चरित्र दिले आहे. त्यात येते की, जेव्हा सद्गुरु मोरे दादा लहान होते त्यांचा नित्यक्रम ते कधीही टाळत नसत. घरातुन शेतात जातांना रोज रामरक्षा, विष्णुसहस्त्रनाम म्हणने चालायचे. वाटेवरची आंब्याची झाडे आता नाही, नाही तर ती झाडेही असती तर त्यांनी सांगितल असातं की हा – हा श्लोक माझ्यापर्यंत पूर्ण होत असे. एखाद्या दिवशी थकल्यामुळे रामरक्षा, विष्णुसहस्त्रनाम म्हनायचे राहिले तरी ते झोपेत ठराविक वेळेला आपोआप होत असे. असा असतो दिनचर्येचा शरीरावर आणि मनावर परिणाम.

उत्तम दिनचर्या कशी असावी?
  • रात्री लवकर झोपावे, सकाळी लवकर उठावे.
  • उपलब्ध वेळेचे योग्य नियोजन करावे – अभ्यास + खेळ + व्यायाम + अवांतर वाचन + प्रार्थना व सेवा + करमणुक यांचे नियोजन आपण नीटनेटके करावे.
  • आपले आचरण शुध्द ठेवावे. शरीराची आणि मनाची स्वच्छता राखावी.
  • आई-वडिलांचा आदर करावा.
  • सकाळी उठल्यावर हात जोडुन प्रातःस्मरण म्हणावे –
    कराग्रे वसते लक्ष्मी | करमध्ये सरस्वती ||
    करमुल्ये तु गोविंदं | प्रभाते करदर्शनं ||
    आपल्या हाताच्या अग्रभागी लक्ष्मीचा वास असतो, मध्ये सरस्वतीचा आणि मुळाशी गोविंदाचा वास असतो. त्यामुळे सकाळी हाताचे दर्शन घ्यावे.
  • जमीनीवर पाय ठेवण्याआधी प्रार्थना करावी –
    समुद्रवसने देवी पर्वत स्तन मंडले|
    विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ||
  • पोटाची आणि दातांची स्वच्छता करुन त्यानंतर सूर्य नमस्कार घालावे.
  • स्नान करुन आई – वडिलांचे दर्शन व चरणतीर्थ घ्यावे.
  • सकाळीच नित्यसेवा करावी. मुलांनी १ माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, २४ वेळा गायत्री मंत्र, ११ वेळा सरस्वती मंत्र, ११ वेळा सूर्य मंत्र आणि गणपती अथर्वशीर्ष, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, ब्रह्मनस्पती स्तोत्र म्हणावे.
  • रोज सात्विक व पौष्टिक आहार घ्यावा. जेवण करतांना कधीही टि.व्ही. बघत जेवण करु नये.
  • सायंकाळी शुभंकरोती, रामरक्षा म्हणावी.
  • शाळेत दिलेला गृहपाठ तसेच रोजची ऊजळणी करावी.
  • रात्री झोपण्यापूर्वी देवाचे दर्शन घ्यावे.
  • झोपी जातांना स्वावलंबी व आदर्श जीवन जगण्याचा संकल्प करत झोपावे.
सूर्यनमस्कार

भारतीय संस्कृतीत सूर्य ही तेजाची देवता मानली जाते. सूर्य सर्व प्रकारच्या शक्तीचे उगमस्थान आहे. सूर्य जीवनदाता आहे. म्हणुन हजारो वर्षांपासुन सूर्योपासना केली जाते. सूर्य नमस्काराचे मूळ संस्कृत नाव 'सांष्टांग सूर्य नमस्कार' असे आहे. त्याचा अर्थ शरीराच्या आठ अंगांनी सूर्यास वंदन करणे असा आहे.

सूर्य नमस्कार हा शरीर, बुध्दी आणि मन या तिघांवरही नियंत्रण ठेवणारा, त्यातुन सुप्त क्षमता वाढवणारा आणि जागृत झालेली शक्ती सत्प्रवृत्त मार्गाला लावणारा व्यायाम आहे. बालसेवेक-यांनी रोज किमान १३ सूर्य नमस्कार घालावे. सूर्याची बारा नावेः-

  1. ओम मित्राय नमः
  2. ओम रवये नमः
  3. ओम सूर्याय नमः
  4. ओम भानवे नमः
  5. ओम खगाय नमः
  6. ओम पूष्णे नमः
  7. ओम हिरण्यगर्भाय नमः
  8. ओम मरीचये नमः
  9. ओम आदित्याय नमः
  10. ओम सवित्रे नमः
  11. ओम अर्काय नमः
  12. ओम भास्कराय नमः

ओम श्री सूर्य नारायणाय नमः

सात्विक व पोषक आहार

फास्ट फुड व कोल्ड ड्रिंक टाळावे.

पालेभाज्या, दुध यांचा समावेश आहारामध्ये करावा.

फळं नियमित खावी.

गुरुमाऊलींचा संदेश – पालकांसाठी

सुजाण पालकत्व : मानवास परमेश्वराने नवनिर्मितीची विलक्षण उन्मेषशालिनी प्रतिभा दिली आहे. माणूस शेकडो वर्षांच्या पलीकडचे खरे अंदाज सहजपणे सांगू शकतो. अप्रतिम चिरंतन कलांची निर्मिती तो सहजपणे लीलया करतो. जे-जे काही अदृश्य व अमूर्त आहे त्याला साकार रुप व सखोल अर्थ माणसाने दिला आहे.