अभ्यास कसा करावा

खुप विद्यार्थी एक प्रश्न नेहमी विचारतात. तो म्हणजे, "मी खुप अभ्यास करतो पण माझ्या लक्षातच राहत नाही. मी काय करु? कसा अभ्यास करु?" मुलांनो, खुप अभ्यास करणं हे ठिक आहे पण तो अभ्यास तुम्ही कश्या पध्दतीनं करतात याला सर्वात जास्त महत्व आहे. काही महिन्यातच तुमच्या वार्षिक परिक्षा सुरु होतील. तेव्हा परिक्षेच्या दृष्टीने आणि अभ्यासाच्या दृष्टीने काही महत्वाच्या गोष्टी आपणासमोर ठेवत आहे.

 • अभ्यास सुरु करण्यापूर्वी त्याचं नियोजन करण खुप महत्वाच आहे. ईंग्रजीमध्ये एक म्हण आहे – Plan the Work & Workout the Plan. म्हणजे कामाचं नियोजन करा आणि नियोजनपूर्वक काम करा. तुमची रोजची दिनचर्या निश्चित असु द्या. त्याचं पालन करा.
 • अभ्यास करण्यासाठी उत्तर आणि पूर्व दिशेच्यामधील कोपरा अर्थात ईशान्य दिशेला पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करुन बसावे.
 • आई – वडिलांच्या रोज पाया पडावं, त्यांचं चरणतीर्थ घ्यावं.
 • स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रोज सरस्वती चूर्ण दुधातुन घ्यावे, पाच पाने तुलसीची खावी.
 • अभ्यास सुरु करण्यापूर्वी "गुरुः ब्रह्मा गुरुः विष्णु…." प्रार्थना म्हणुन श्री गणेश आणि सरस्वती माता यांच स्मरण करुन नमस्कार करावा. प्रार्थना पहिले म्हणण्याचा अभिप्राय, मनाला ग्रहनशील बनवुन ज्ञानाभिमुख बनवणे आणि दुस-या अशुभ भावनांपासुन त्याला दुर नेऊन शांत करणं, हा होय. यामुळे पहिल्यापासुन चालु असलेले विचार शांत होऊन मन अभ्यासात लागेल. सुरुवातीचे पहिले १०-१५ मिनिट तुमचं मन अभ्यासल्या जाणा-या विषयात खोलात जाणार नाही. पण नंतर मात्र ते पूर्णपणे त्या विषयात गढुन जाईल. जेव्हा मनाची अशी एकाग्रता साधली जाईल तेव्हा मनाच्या या स्थितीचा फायदा घेऊन सलग एक ते दोन तास आपल्या क्षमतेनुसार अभ्यास करावा.
 • 'एकाग्रता ही ज्ञानप्राप्तीची गुरुकिल्ली आहे', त्यामुळे एकाग्रता साध्य करण्याचा प्रयत्न करा. एकाग्रता साधन्यासाठी काही उपाय तुम्हाला शिकावे लागतील. अभ्यास करतांना बरेच विद्यार्थी आपले हात, पाय हलवत असतात, काहीजण खुप खोल विचारात असण्याच्या आवेशात इकडे-तिकडे बघत बसतात किंवा पेन – पेन्सिल चावतात. काहीजण तर मनातल्या मनातच कल्पानांमध्ये रममान होत मनासोबत खेळत राहतात. हे सर्व एकाग्रतेमधील विघ्न आहेत हे लक्षात घ्यावं. 'अवधान' या विशेष शब्दाचा प्रयोग मनाच्या सतर्कतेविषयी और जागृतीविषयी करण्यात येतो. तेव्हा 'अवधान' ठेऊन अभ्यास करावा तरच एकाग्रता संभव आहे.
 • पुस्तक नुसतं वाचनं एक गोष्ट आणि त्याचा सखोल अभ्यास करणं ही दुसरी गोष्ट. वरच्या वर्गात शिकणा-या विद्यार्थ्यांनी हे समजुन घेतल पाहिजे की विज्ञानातले सिध्दांत, गणिताचे सुत्र - समिकरण, भाषा विषय या विषयांना समजनं एक गोष्ट आणि त्यांच सुयोग्य वापर करायला शिकणं ही दुसरी गोष्ट. या दिशेने विचार करुन अश्या युक्त्या तुमचे तुम्हीच शिकायला हव्या.
 • प्रत्येक विषयाचा अभ्यास त्या विषयाला अनुरुपच करावा. जसं भाषा विषयांचा अभ्यास करतांना शब्दांचे अर्थ, कवितेच्या ओळी, म्हणी यांचे अर्थ जाणुनच कण्ठस्थ करावे आणि धड्यांचा अभ्यास करतांना त्यांचा अर्थ समजावुन घेऊन त्यातील सार भाग लक्षात ठेवावा. गणिताचा अभ्यास करतांना गणिताचे सुत्र समजुन कण्ठस्थ करावे आणि त्यांचा सुयोग्य प्रयोग करनं शिकावं. विज्ञानाचा अभ्यास करतांना वैज्ञानिक सुत्र तसेच व्याख्या लक्षात ठेवाव्या, वैज्ञानिक सिध्दान्त समजुन घेऊन नैसर्गिक घटनांमध्ये दडलेले रहस्य जानुन घ्यावे. कोणत्याही धड्यातील भावार्थ अर्थात सार लक्षात ठेवावा, त्याचं विस्तृत वर्णन लक्षात ठेवण्याची गरज नाही. याप्रमाणे आपल्या बुध्दीचा विकास प्रत्येक विषयानुरुप त्या-त्या दिशेत करण्याचं आपण शिकल पाहिजे. काही विद्यार्थ्यांना पाठ करणं सोप जातं, काहींना गणिताचे समिकरण सोडवणं सोप जातं, काहींना दिर्घोत्तरी लेखन सोप जातं. पण… बुध्दीमत्ता तीच ज्याद्वारे बुध्दीचा प्रत्येक दिशेत विकास केला जाईल. अश्या मानसाला 'प्रज्ञावान' असं म्हटल्या जातं. प्रज्ञावान होण्यासाठी रोज "प्रज्ञा-विवर्धन स्तोत्र" वाचायला हवं.
 • जर कोणाला एखादा विषय अवघड वाटत असेल तर घाबरु नका. तर धैर्याने मन शांत ठेउन त्या विषयाचा सखोल अभ्यास करा. त्या विषयाचा सखोल आणि नियमित अभ्यास केल्याने तो विषय अवघड वाटणार नाही. अभ्यासात आवड निर्माण होणं सर्वात महत्वाचं आहे. जर मनाला एखादी गोष्ट आवडत असेल तर मनाला जबरदस्तीनं त्यात लावावं लागत नाही, ते आपोआप त्यात लागतं.
 • विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर ध्येय ठेवणं आवश्यक आहे. भलेही लक्ष्यप्राप्ती मध्ये कमी राहुन जाईल. परंतु ध्येय ठेवल्याने मनाला दिशा मिळते. स्वामी विवेकानंद म्हणतात की, "ध्येय असलेला मनुष्य एक हजार चुका करेल तरीही ठीक आहे कारण ज्याला कुठलही ध्येय नाही असा मनुष्य पन्नास हजार चुका करेल." यासाठी ध्येय समोर ठेऊन त्याच्या प्राप्तीसाठी संकल्पशक्ती जागृत करा.
 • ध्येय प्राप्त करण्यासाठी सर्वात जास्त आवश्यकता आहे ती शिस्तीची. शिक्षण प्रणालीतुन आपण हे शिकलं पाहिजे की आपण जीवनात शिस्त लावायला हवी. नियमांना – शिस्तीला आपण बंधनाच्या रुपात पहातो हीच आपली सर्वात मोठी समस्या आहे.स्वावलंबन आणि शिस्तीमुळे आपली अस्ताव्यस्त असणारी आणि वाया जाणारी शक्ती याला दिशा मिळुन एकत्रितपणे तीची ऊर्जा वाढते. उदाहरणरुप जसे पाणी किंवा वायुला एक सुनियंत्रित दिशा दिली तर त्याच्या प्रवाहातील सर्व अडथळे दुर करत ते पुढे जाते.
 • अभ्यास करतांना निरंतर दोन-तीन तास अभ्यास केला पाहिजे. नंतर थोडी विश्रांती घेऊन पुन्हा अभ्यासाला लागावे. जास्त बौध्दिक काम केल्यावर मेंदुवर तनाव येतो, तेव्हा त्याला अवश्य विश्रांती द्या. विश्रांती केव्हा घ्यायची हे सर्वस्वी ज्याच्या – त्याच्या मानसिक सामर्थ्यावर अवलंबुन आहे. आपल्या बुध्दीची कुशाग्रता, मेंदुचे सामर्थ्य आणि एकाग्रता वाढवणं हे काही एक - दोन आठवड्याचं कामं मुळीच नाहे. यासाठी फक्त परिक्षेच्या काळातच अभ्यास करुन चालणार नाही पण वर्षभर तुम्ही नियमित अभ्यास करावा.
 • परिक्षांना घाबरण्याचं बिलकुल कारण नही. तुम्ही वर्षभर जे शिकले तेच लिहायचं आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी घाबरण्यापेक्षा धैर्याने वर्षभर अर्जित ज्ञान परिक्षकाच्या परिक्षणासाठी योग्य रितीने मांडायचं आहे. आपण अशी मानसिकता बनवायला हवी जेणेकरुन चिडचिडेपणा, अशांती, घबराहट दुर होवो आणि प्रसन्नता, शांतीने तुम्ही परिक्षा देऊ शकाल.
विद्यार्थ्यांसाठी परिक्षेत यशप्राप्ती साठी आवश्यक सेवा …

२१ दुर्वा, २रुईचे फुल, अडीच आपट्याचे पानम हातात घेऊन गणपती अथर्वशीर्ष, श्री स्वामी समर्थ मंत्र १ माळ, सरस्वती मंत्र ११ वेळा, सूर्य मंत्र – ११ वेळा, गायत्री मंत्र २४ वेळा जपावा आणि ते लाल कपड्यात बांधुन सोबत ठेवावे. मात्र तुम्ही अभ्यास करणं जरुरी आहे.

गुरुमाऊलींचा संदेश – पालकांसाठी

सुजाण पालकत्व : मानवास परमेश्वराने नवनिर्मितीची विलक्षण उन्मेषशालिनी प्रतिभा दिली आहे. माणूस शेकडो वर्षांच्या पलीकडचे खरे अंदाज सहजपणे सांगू शकतो. अप्रतिम चिरंतन कलांची निर्मिती तो सहजपणे लीलया करतो. जे-जे काही अदृश्य व अमूर्त आहे त्याला साकार रुप व सखोल अर्थ माणसाने दिला आहे.